धक्कादायक! प्रसिद्ध बिल्डरकडून तरुणीवर बलात्कार
पुणे | Crime Famous builder sexual assualt girl in Pune: गेल्या काही दिवसांपासून पुण्याबरोबरच महाराष्ट्रात देखील महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातून अनेक घटना समोर येत आहेत. अशीच पुण्यातून महिला बलात्काराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार (rape) केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारत देसडला असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. गेल्या काही काळापासून आरोपी बिल्डरने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
आरोपी भारत देसडला हे पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळख आहे. तसेचआरोपी देसडला हे अलीकडेच घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्ष देखील होते. देसडला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी देसडला हे पुण्यातील प्रसिद्ध रोहन बिल्डर्सचे भागीदार आणि संचालक आहे. आरोपी बिल्डरने गेल्या काही दिवसापासून पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे.
पीडित तरुणीने लग्नासाठी विचारणा केली असता, आरोपीने लग्नाला नकार दिला आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस कोणतीही कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.
Web Title: Crime Famous builder sexual assualt girl in Pune