संगमनेर: महिला घराच्या आडोशाला करीत होती अवैध काम, पोलिसांचा छापा
Breaking News | Sangamner Crime: अवैध दारुविक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा.
संगमनेर: तालुक्यातील घुलेवाडी येथील भाटनगरमध्ये अवैधरित्या देशी दारुची विक्री करणाऱ्या महिलेकडून संगमनेर शहर पोलिसांनी ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, सर्रासपणे अवैधरित्या विक्री होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की घुलेवाडीतील भाटनगरमध्ये अवैधरित्या देशी दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी छापा टाकला असता साधना बादशहा माचरेकर (वय ४४) ही महिला घराच्या आडोशाला दारु विक्री करत असताना आढळली. तिच्याकडून ६३० रुपयांच्या देशी दारुच्या नऊ बाटल्या ताब्यात घेतल्या. याप्रकरणी पोकॉ. विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील महिलेवर मुंबई दारुबंदी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ. वाकळे हे करत आहे. दरम्यान, केवळ छातुरमातूर कारवाई होत असताना सर्रासपणे मोठ्या विक्रेत्यांकडे दुर्लध होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
Web Title: Crime against woman in illegal liquor sale case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study