Home अहमदनगर मुलाच्या अपहरणप्रकरणी दोघांवर गुन्हा, गावकऱ्यानी दिला चांगलाच

मुलाच्या अपहरणप्रकरणी दोघांवर गुन्हा, गावकऱ्यानी दिला चांगलाच

Breaking News | Ahmednagar: दोन मोटारसायकलींवर आलेल्या इसमांनी त्या मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न, आरोपींना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला.

Crime against two in child abduction case

कोपरगाव : तालुक्यातील उक्कडगाव शिवारातून एक १० वर्षे वयाचा मुलगा शाळेत जात असताना घोयेगाव ते उक्कडगाव रोडवर अशोक बाबुराव शिंदे यांच्या घराच्या पुढे दोन मोटारसायकलींवर आलेल्या इसमांनी त्या मुलास पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब उघडकीस आल्यावर या आरोपींना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला.

याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिलेली माहिती अशी, असलम अजमेर पठाण, शरीफखान मस्तानखान पठाण (दोघेही रा. कठोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक मोटारसायकल जप्त केली आहे. मुलाचे वडील उत्तम विष्णू निकम (रा. उक्कडगाव, ता. कोपरगाव) यांनी फिर्याद दिली की, काल गुरूवारी (दि. ८) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास १० वर्षांचा मुलगा शाळेत जाण्यासाठी घोयेगाव ते उक्कडगाव रोडने जात असताना आरोपी मोटारसायकलवर आले व मुलाला म्हणाले, बेटा इधर आओ, हमारे साथ गाडी पर बैठो, तुझे स्कूल में छोड देते है, असे म्हणून त्यास पळवून नेण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र ही बाब निकम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांसह त्यांचा पाठलाग केला. तेव्हा आरोपी मक्याच्या शेतात लपले, त्यांना शोधून काढत चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोटारसायकल जप्त केली आहे. त्यामुळे उक्कडगाव व आजूबाजूच्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against two in child abduction case

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here