Home अहमदनगर Crime: तहसीलदारांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण

Crime: तहसीलदारांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण

Crime against tehsildar, what is the case

नेवासा | Newasa Crime:  करोना (Covid 19 ) प्रादूर्भाव प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत जिल्हाधिकारी (collector) अहमदनगर यांनी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना जमा होण्यावर बंदी, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आदी सक्ती केलेली असतानाही या नियमांचे पालन न करता नेवाशाच्या तहसीलदारांनी 10 ते 15 कर्मचार्‍यांसमवेत 23 जून 2020 रोजी कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने नेवासा पोलीस ठाण्यात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर गुन्हा (Crime ) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजय जानकू नारळे (वय 44) धंदा-शेती रा. माळीचिंचोरे ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी स्वतःचा वाढदिवस शासकीय कार्यालयात 10 ते 15 कर्मचार्‍यांसह मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता व पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमून धुमधडाक्यात साजरा केला होता. याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. मात्र तरीही तहसीलदार यांच्यावर कारवाई न केल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद कोर्टात क्रिमीनल रिट पिटीशन करण्यात आले होते.. न्यायालयाने 30 जुलै 2021 रोजी निकाल देवून संबंधीत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web TItle: Crime against tehsildar, what is the case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here