Home अहमदनगर Crime: खासगी सावकार पिता पुत्रांवर गुन्हा, पैसे देऊनही….

Crime: खासगी सावकार पिता पुत्रांवर गुन्हा, पैसे देऊनही….

Karjat News moneylender:  पैसे देऊनही तारण म्हणून घेतलेली जमीन सावकाराने परत न करता मारहाण.

Crime against private moneylender father and son

कर्जत: अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात खासगी सावरकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी सावकाराकडून व्याजाने घेतलेल्या 6 लाख रूपयांचे रकमेची व्याजासह 9 लाखाची परतफेड करूनही तारण म्हणुन घेतलेली जमीन सावकाराने परत केली नाही. उलट शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावकार पिता पुत्रावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोपट गणपत काळे व भाऊसाहेब पोपट काळे (रा. जलालपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. जलालपूर येथील शंकर सर्जेराव घोंगडे (29) यांनी 6 जुलै 2019 रोजी जमीन खरेदी करण्यासाठी खाजगी सावकार यांच्याकडून 6 लाख रुपये 3 रुपये टक्के व्याजदराने घेतले होते. त्याबदल्यात फिर्यादीच्या नावावर असलेल्या जमीनीपैकी 20 गुंठे जमीन सावकाराचा मुलगा भाऊसाहेब काळे याच्या नावावर मुद्दल व व्याजाची रक्कम परत दिल्यानंतर परत नावावर करण्याच्या बोलीवर दिली होती.

घोंगडे यांनी 7 जुलै 2020 रोजी व्याजापोटी सावकार पोपट काळे यांना दिड लाख रुपये रोख दिले होते. त्यानंतर पुन्हा 1 जानेवारी 2021 रोजी फिर्यादीला द्राक्ष विक्रीचे पैसे आल्याने सावकाराला 5 लाख रुपये रोख मुद्दल स्वरूपात दिले. त्यानंतर 30 जुलै 2022 रोजी फिर्यादीने स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर फायनान्स करून अडीच लाखाची रक्कम मुद्दल व व्याजापोटी सावकाराला दिली. असे 3 लाख व्याजाचे व मुद्दालीचे 6 लाख असे एकूण 9 लाख रुपये खासगी सावकार पोपट काळे यांना दिली.

17 सप्टेंबर रोजी घोंगडे यांनी जमीन परत मागितल्यानंतर सावकार पिता पुत्राने आमचे उरलेले व्याजाचे अडीच लाख रुपये दे असे म्हणत अश्लील शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शेतातील टोमॅटो पिकाला जोडणी केलेले ठिबक काढून उपसून फेकून दिले व पीव्हीसी पाईप फोडून नुकसान केले. व्याजाचे पैसे परत दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाहीफ अशी धमकी दिली. यानंतर घोंडगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यावरून दोन्ही खासगी सावकारांच्या महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wen Title: Crime against private moneylender father and son

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here