Home संगमनेर संगमनेर: अपघातातील मृत्यूप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

संगमनेर: अपघातातील मृत्यूप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

Breaking News | Sangamner: रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जखमी दुचाकीस्वार मृत पावला.

Crime against contractor in case of accidental death

संगमनेर: पिंपरणे अंभोरे पुलाच्या कामासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जखमी दुचाकीस्वार मृत पावला. दरम्यान, या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुल कामाचा ठेकेदार एन. के. गाडे विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघू गजाबा कडनर (५५, रा. अंभोरे) असे मृत इसमाचे नाव आहे.

या प्रकरणी मृत कडनर यांचा मुलगा शुभम कडनर यांनी ठेकेदाराविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. राघु कडनर प्लॅटीना मोटारसायकल (क्र. एम. एच. १७ सी डब्ल्यू ४६९७) वरून अंभोरे येथून २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संगमनेर येथे कार्यक्रमासाठी आले होते. रात्री ते पुन्हा घरी अंभोरेकडे दुचाकूवरुन जात होते. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अंभोरे गावातून पिंपरणे ते कोळवाडे रस्त्यावर पुलाच्या कामासाठी सुमारे ८ फूट खोल खड्डे खोदले आहेत. या रस्त्यावरुन कडनर घरी येत असताना पांडु वर्षे यांच्या घराजवळ सुरक्षेसाठी सावधानतेचे बोर्ड, खुणा, रिफलेक्टर, लाल निशाण व रेबीन, दुभाजक रस्त्याची पाटी न लावता खबरदारीचे उपाय न करता निष्काळजीपणे रस्त्याचे काम ठेकेदार एन. के. गाडे यांनी सुरु ठेवले. रात्री या खड्ड्यात राघु कडनर दुचासीसह पडून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने ते मृत पावले. सकाळी ही घटना नागरिकांनी पाहिल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास केला असता, अपघातास ठेकेदार एन. के. गाडे कारणीभुत असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. काँ. गुंजाळ तपास करीत आहे.

Web Title: Crime against contractor in case of accidental death

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here