Home अहिल्यानगर अहिल्यानगर: क्रिकेट व शेअर बाजार सट्टा रॅकेट उघडकीस

अहिल्यानगर: क्रिकेट व शेअर बाजार सट्टा रॅकेट उघडकीस

Breaking News | Ahilyanagar:  परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे छापा टाकत क्रिकेट सामन्यावर व शेअर बाजारावर ऑनलाईन सट्टा खेळविणार्‍या दोघांना रंगेहाथ पकडले.

Cricket and stock market betting racket exposed

अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकपूर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे छापा टाकत क्रिकेट सामन्यावर व शेअर बाजारावर ऑनलाईन सट्टा खेळविणार्‍या दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी मोबाईल फोन, वही, कॅल्क्युलेटर व बनावट ओळखपत्रासह सुमारे 17 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (4 ऑगस्ट) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार लक्ष्मण खोकले, संतोष खैरे, बिरप्पा करमल, अरूण मोरे व अर्जुन बडे यांना सूचना दिल्या की, हॉटेल सिंग रेसिडेन्सीच्या खोली क्रमांक 201 मध्ये दोन इसम क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळवत आहेत. त्यानुसार, दोन पंच समक्ष हॉटेलमध्ये कारवाई करण्यात आली. खोली क्रमांक 201 मध्ये मधुकर सखाराम येवले (रा. मुलुंड कॉलनी, मुंबई) हा इसम आढळून आला. त्याच्यासोबत आणखी एक इसम असल्याचे सांगण्यात आले मात्र त्याचे नाव-गाव सांगितले गेले नाही.

रूमची पाहणी केली असता, एका मोबाईलवर पाकिस्तान व वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 क्रिकेट सामना सुरू असल्याचे निदर्शनास आले. मोबाईलच्या मेसेजमध्ये विविध आयडी, संकेतशब्द आणि ऑनलाइन सट्टा संबंधित माहिती आढळून आली. शिवाय वहीमध्येही वेगवेगळ्या बुकींची नावे, क्रमांक आणि संकेतशब्द नोंदलेले आढळले.

बनावट कागदपत्रांचा वापर

तपासादरम्यान संशयित आरोपीने कबूल केले की, त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून त्याचा वापर हॉटेलमध्ये खोली बुकिंगसाठी केला होता. तसेच दुसर्‍याच्या नावाने सिमकार्ड घेतले असून त्याव्दारे सट्टा खेळविला जात होता.

Breaking News: Cricket and stock market betting racket exposed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here