Home महाराष्ट्र सहावीत शिकणाऱ्या चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार, तिघांना अटक

सहावीत शिकणाऱ्या चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार, तिघांना अटक

Raigad Minor Girl Rape : अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक.

Cousin studying in class 6 repeatedly abused, three arrested

रायगड: रायगड जिल्ह्यातील वारसे गावात अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकते. पीडिताची आई बाहेर असल्याने तिच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पहिली घटना ३० डिसेंबर २०२४ रोजी घडली होती. पीडित मुलगी सायकलवरून घरी जात असताना मुख्य आरोपीने तिला घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती रोहाचे उपअधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

दरम्यान, २ जानेवारी आणि ३ जानेवारी रोजी आरोपीने पुन्हा पीडितावर अत्याचार केले. मात्र, यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या एका नातेवाईकाला सांगितला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकाने पीडिताच्या आईला माहिती दिली आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला. हे कुटुंब पोलीस ठाण्यात जात असताना मुख्य आरोपीच्या दोन भावांनी त्यांचा रस्ता अडवून गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली, असेही तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Cousin studying in class 6 repeatedly abused, three arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here