Home अहिल्यानगर अहिल्यानगर: चुलत्याकडून पुतणीचा दगड घालून खून

अहिल्यानगर: चुलत्याकडून पुतणीचा दगड घालून खून

Breaking News | Ahilyanagar: जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला  श्रीगोंद्यातील दोघांवर गुन्हा.

Cousin kills nephew by throwing stone at him

पारनेर : तालुक्यातील राळेगण थेरपाळजवळील माजमपूरमध्ये १ जुलै रोजी रात्री जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.

प्रतीक्षा रितेश भोसले असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेतील आरोपी हा मयत मुलीचा चुलता व चुलत आजोबा असून या संबंधीची फिर्याद बुधवारी रितेश ठुब्या उर्फ सुभाष भोसले (वय ३५, रा. माजमपूर, राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलिसांत दिली. पोलिसांनी आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले व उर्कुलस जलद्या काळे (रा. खरातवाडी, बेलवंडी, ता. श्रीगोंदा) या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील फिर्यादी रितेश भोसले यांचा भाऊ आशिष उर्फ आबड्या ठुब्या भोसले यांची मुलगी अस्मिता आशिष भोसले एक महिन्यापूर्वी तळ्यातील पाण्यात पडून मयत झाली होती.

त्यामुळे आशिष भोसले व त्याचा सासरा उर्कुलस जलद्या काळे यांनी फिर्यादी यांची मुलगी प्रतीक्षा हिच्यामुळेच आमच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला याचा राग मनात धरून मंगळवारी प्रतीक्षा भोसले हिच्या डोक्यात दगड घालून ठार मारले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

Breaking News: Cousin kills nephew by throwing stone at him

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here