Home अहमदनगर अहमदनगर: पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला २० वर्षांची शिक्षा

अहमदनगर: पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाला २० वर्षांची शिक्षा

Breaking News | Ahmednagar: Court Sentenced 20 year Jail to Rapist Uncle: काकाने घरात प्रवेश करून पीडितेसह तिच्या भावाला व आईला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला, ही घटना २०१९ मध्ये घडली होती.

Court Sentenced 20 year Jail to Rapist Uncle

अहमदनगर: अल्पवयीन चुलत पुतणीवर पाच महिने वारंवार अत्याचार करणाऱ्या चुलत काकास अतिरिक्त सह जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पारशिवनी तालुक्यातील सिहोरा येथील रहिवासी असलेल्या या नराधम काका विरोधात कन्हान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

अतिरिक्त सह जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओ. पी. जैस्वाल यांनी हा निर्णय दिला. ही घटना २०१९ मध्ये घडली. त्यावेळी पीडिता ही केवळ १३ वर्षे आठ महिन्यांची होती. तर, १० फेब्रुवारी २०२० रोजी पीडितेने या नराधमाविरोधात पोलिसात तक्रार दिली. पीडितेची आई आणि वडिलांचे पटत नसल्याने वडील आत्याच्या घरी वास्तव्याला आले. आई खाजगी काम करते. त्यामुळे, घटना काळामध्ये पीडिता घरी एकटीच असायची.

ही संधी साधून या काकाने घरात प्रवेश करून पीडितेसह तिच्या भावाला व आईला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर, संधी साधून वेळोवेळी त्याने पीडितेवर अत्याचार केले. या प्रकारामुळे पीडितेला सतत ताप यायचा. ३ फेब्रुवारी २०२० रोजी तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे, आई व मोठ्या बहिणीने तिला दवाखान्यात नेले असता ती गर्भवती असल्याचे लक्षात आले.

घरी गेल्यानंतर पीडितेने सर्व आपबीती आईला सांगितली. आरोपी नात्यातीलच असल्याने व बदनामीच्या भीतीने सामंजस्याने प्रकरण मिटवू, असे ठरवून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे त्यांनी टाळले. परंतु, आरोपीची बहीण व आत्याने पीडितेला व तिच्या आईला शिवीगाळ केली. तसेच, आमचा मुलगा असा नाहीच, अशी भूमिका घेतली. त्यामुळे, पीडितेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

अतिरिक्त सह जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

Web Title: Court Sentenced 20 year Jail to Rapist Uncle

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here