Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात खळबळ: घराच्या छतावर आढळले दाम्पत्याचे मृतदेह

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ: घराच्या छतावर आढळले दाम्पत्याचे मृतदेह

couple's Dead bodies was found on the roof of the house

Ahmednagar | अहमदनगर | Kopargaon:  अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील आपेगाव भुजाडे वस्ती इथ एक धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या छतावर झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (Dead bodies) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी मृतदेहाच्या चेहऱ्यावर काही खूणा दिसून येत असल्याने हत्येची (Murder) शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय 75) आणि पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65) असे मयत पती पत्नीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गंगाधर भुजाडे व त्यांची पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे हे दोघेच आपेगाव शिवारात आपल्या शेतात राहत होते. त्यांना दोन विवाहित मुले असून ते कामानिमित्त पुणे येथे राहतात. सोमवार दि. 30 मे रोजी सायंकाळी हे दोघे पती पत्नी तळेगाव येथे सप्ताहच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यांनतर त्यांच्या मुलाने नेहमीप्रमाणे त्यांना फोन केले असता त्यांनी फोन उचलला नाही. दरम्यान, मुलाने बुधवार दि. 1 जून रोजी सांयकाळी त्यांच्या चुलत भावाला फोन करून चौकशी करण्यास सांगितले असता चुलत भाऊ एका जोडीदारासोबत वस्तीवर गेला असता त्या ठिकाणी घराचे दरवाजे बंद होते. त्यांनी घरा शेजारी असलेल्या पोलवर चढून पाहिले असता घराच्या छतावर ते दोघे अंथरुणावर मयत अवस्थेत असल्याचे त्यांना आढळून आले. तात्काळ सदर घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील, गावकरी व पोलिसांना दिली सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. कोपरगाव तालुका पोलिसांनी पंचनामा करून सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याप्रकरणी  अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: couple’s Dead bodies was found on the roof of the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here