संगमनेरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९ हजार पार
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी ९८ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या ९ हजार पार करत ९०८१ इतकी झाली आहे.
शनिवारी १२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ८३३० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तालुक्यात सध्या ५८६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. ६७ जणांनी आपला जीव गमविला आहे.
शहरातील बाधित संख्या २७३६ तर ग्रामीणची ६२५७ आहे. सर्वाधिक रुग्ण १९१९ हे मार्च महिन्यात आढळून आले आहेत. तालुक्यात प्रचंड प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. चिंता वाढल्याने प्रशासनाची धावपळ होत आहे. नियमांचे पालन होताना दिसत नाही. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेंद भोसले यांनी रविवारी सायंकाळी संगमनेर व अकोले तालुक्यात करोना आढावा भेट घेतली. यादरम्यान ते म्हणाले करोना चाचणीचा अहवाल येण्यास आठ दहा दिवस लागतात. ही गंभीर बाब आहे. तालुका आरोग्य विभागाने सजग राहावे. पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष कारवाईवर भर द्यावा अन्यथा गाय केली जाणार नाही. जिल्ह्यात सध्या ९ हजार ३३७ रुग्ण उपचार घेत आहे. ऑक्सिजन, लस, औषधे कमी पडणार नाही असे त्यांनी माहिती दिली.
Web Title: coroners in Sangamner has crossed 9 Thausand