मामाच्या गावी भेटायला गेलेला तरुण निघाला करोना पॉझिटिव्ह, आठ जण कोरांटाईन
राहता: रविवारी राहता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले मात्र तो तरुण मागील महिन्यातील २५ मे रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपली आईसोबत मामाच्या गावी आपल्या आजीला भेटण्यासाठी गेला होता.
तो तरुण दिवसभर तेथेच राहिला होता. दरम्यान हा तरुण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोधेगाव येथील कुटुंबातील आठ जणांना कोपरगाव येथील करोना केअर सेंटर येथे कोरांटाईन करण्यात आला आहे. यामधील जवळच्या संपर्कातील पाच जणांचे स्त्राव अहमदनगर सामान्य रुग्णालायात पाठविण्यात आले आहे. आणखी चार व्यक्ती संपर्कात आल्याचे समजते त्यांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी सांगितले आहे. गाव पुढील २४ तासांसाठी बंद केले आहे. तेथील सर्व कुटुंबाना होमकोरांटाईन करण्यात आले आहे अशी माहिती सरपंचानी दिली आहे.
Website Title: Coronavirus Young man uncle’s village turned out to be corona positive