Coronavirus: राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढणार का?
Coronavirus/मुंबई: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला होता. तो लॉकडाऊन १४ एप्रिलला संपत आहे. देशात बऱ्याचशा राज्यात करोनाबाधितांची संख्या पाहता लॉकडाऊन वाढवण्याची मागणी काही राज्यांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून संवाद साधत आढावा घेत आहेत. या बैठकीनंतर लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत केंद्रसरकारकडून घोषणा करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याची वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिल आहे. राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली आहे. महाराष्ट्रबरोबरच दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी देखील लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे.
देशात करोना बाधितांची संख्या साडे सात हजारांच्या वरती गेली आहे. यातील २० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहे. करोनाचा सामना करण्यासाठी मदतीचे आवाहन देखील मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केले आहे. राज्यातील लॉकडाऊन वाढविण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
Website Title: coronavirus Will lockdown in the state increase