संगमनेर तालुक्यातील ११ संशियीतांचे अहवाल निगेटिव्ह
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील सर्व ११ जणांचे करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून आश्वी येथील संशयित विलगीकरण करण्यात आलेल्या २२ जणांना गुरुवारी आरोग्य विभागाने सुट्टी दिल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दोन आठवड्यापूर्वी आश्वी बुद्रुक याठिकाणी करोनाबाधित रुग्ण आढळल्याने तपासणी अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तींना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांना संगमनेर येथील रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या संशियीत व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने १४ दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.त्यांना आश्वी बुद्रुक येथील घरी होमकोरांटाइन करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.
संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे काही दिवसापूर्वी एक संशियीत व्यक्ती आली होती. या व्यक्तीची व तिच्या संपर्कात्तील इतरांची खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यामुळे या व्यक्तीच्या अहवालाकडे संगमनेर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या व्यक्तिंसह संपर्कातील ११ व्यक्तींच्या तपासणी अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आले. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
Website Title: Coronavirus suspects in Sangamner taluka report negative