संगमनेरात करोनाचा कहर: आज एकाच दिवशी पाच करोनाबाधित आढळले
संगमनेर: संगमनेर तालुक्यात करोनाने कहर केला आहे. काही केल्या बाधा हटेना. आज सकाळी दोन बाधित आढळून आल्यानंतर पुन्हा दुपारी तीन रुग्ण आढळून आले आहेत असे आज दिवसभरात पाच रुग्ण आढळून आले आहेत.
संगमनेर शहरात सकाळी भारतनगर येथे ३३ वर्षीय व्यक्ती ही मागील व्यक्तीच्या संपर्कातील आहे. मोमिनपुरा येथील ७१ वर्षीय जेष्ठ नागरिक आढळून आला आहे तर दुपारी निमोण येथील ७५ वर्षीय पुरुष तसेच सिन्नर येथील ५६ वर्षीय पॉझिटिव्ह आढळून आला आहे. भारत नगर येथे आणखी एक ५४ वर्षीय महिला आढळून आली आहे असे एकूण संगमनेर तालुक्यात आज पाच रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेरमध्ये करोना रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. सिन्नर येथील एक व्यक्तीचा समावेश आहे मात्र त्याची चाचणी संगमनेरमध्ये करण्यात आल्याने त्याचा समावेश करण्यात आला आहे. या करोनाचा कहर हा वाढतच चालल्याने प्रशासन सतर्क झाले असून परिसर सील करण्याचे काम सुरु आहे.
Website Title: Coronavirus Sangamner taluka five patient today