Coronavirus: संगमनेर तालुक्यात ५२ करोनाबाधित तर एकाचा मृत्यू
संगमनेर | Coronavirus: संगमनेर तालुक्यात सोमवारी ५२ करोनाबाधित आढळून आले आहेत तर एकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील मृत्यूची संख्या २९ झाली आहे. तालुक्यात करोनाबाधितांची संख्या २०५४ इतकी झाली आहे.
सोमवारी सायंकाळी प्राप्त अहवालात ५२ रुग्ण यामध्ये कोष्टी गल्ली येथे ४५ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, पंपिंग स्टेशन येथे ३४ वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथे ५५ वर्षीय महिला, रंगारगल्ली येते ५८ वर्षीय व्यक्ती, माळीवाडा येथे २७ वर्षीय तरुण, तालुक्यातील कौठे बुद्रुक येथे ३६ व २५ वर्षीय तरुण, २२ वर्षीय महिला, १४ वर्षीय बालिका, यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शासकीय प्रयोगशाळा प्राप्त अहवालात तालुक्यातील चंदनापुरी येथे ६५,५२,४९ वर्षीय पुरुष, ६०,३८,१६ वर्षीय महिला, १४ वर्षीय, ५ वर्षीय बालक, पिंपळगाव देपा येथे ३७ वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे ७० व ५०,२६,२७ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला,९ वर्षीय बालक, राजापूर येथे ५१ वर्षीय पुरुष, कुरकुटवाडी येथे ६० वर्षीय महिला, मांडवे बुद्रुक येथे ४८ वर्षीय व्यक्ती, साकुर येथे ६० व ४२ वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे ६०,६२,३८ वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथे २९ वर्षीय तरुण, पेमगिरी येथे २९ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, कासारा दुमाला येथे २३ वर्षीय महिला, बोटा येथे ११ वर्षीय बालक, सुकेवाडी येथे २६ वर्षीय तरुण, अंभोरे येथे १७ वर्षीय तरुणी, तालुक्यातील चिंचपूर येथे ७० वर्षीय पुरुष, ६५,२२ वर्षीय, २७ वर्षीय तरुण. आंबी दुमाला येथे ४७,२४,२१ वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरुष, ८ महिन्याची बालिका, सावरगाव तळ येथे ४८ वर्षीय पुरुष असे आज ५२ करोनाबाधित आढळून आले आहेत.
रविवारी संगमनेर शहरातील गिरीजानगर येथील ५९ वर्षीय करोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यामुळे शहराला धक्का बसला आहे.
Web Title: Coronavirus Sangamner taluka 52 infected