Coronavirus: संगमनेर तालुक्यात ३८ नवे करोनाबाधित
संगमनेर | Coronavirus: संगमनेर तालुक्यात गुरुवारी करोना बाधितांच्या संख्येत ३८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या १३१० इतकी झाली आहे.
खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालात गणेशनगर २४ वर्षीय महिला, २३ वर्षीय तरुण, घासबाजार येथील ८० वर्षीय वृद्ध, वडगावपान येथील १७ वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील ६६ वर्षीय व्यक्ती, आश्वी बुद्रुक येथे ५० वर्षीय व्यक्ती, राजापूर येथील ७० वर्षीय व्यक्ती, श्रीरामनगर येथील ५७ वर्षीय महिला, श्रमिकनगर येथे ४७ वर्षीय महिला, गोल्डन सिटी ५३ वर्षीय व्यक्ती, शिंदोडी येथील ३० वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील ४१ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.
तसेच रॅपिड अँटीजेन चाचणीतून प्राप्त अहवालात बोटा येथे १ वर्षाचे बालक, शहरातील काठे मळा ५८ वर्षीय व्यक्ती, १७ वर्षीय तरुण, ३९ वर्षीय महिला, ६ वर्षीय बालिका, कर्हे येथील ६५ वर्षीय, १९ वर्षीय महिला, २० वर्षीय महिला, ३८ वर्षीय, २१ वर्षीय तरुण तसेच १३ महिन्याचे बालक यांनाही करोनाची बाधा झाली आहे.
तालुक्यातील वेल्हाळे येथे ८० वर्षीय, ६५ वर्षीय व्यक्ती, ३५ वर्षीय तरुण, ९, ३ वर्षीय बालक, ३५ वर्षीय महिला, कुरकुंडी येथे ४५ वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे १२ वर्षीय बालक, शहरातील स्वामी समर्थ नगर ५४ वर्षीय व्यक्ती, २४ वर्षीय तरुण, ४९ वर्षीय व २५ वर्षीय महिला, खांबा येथील २५ वर्षीय तरुणी, वडगाव पान येथे ४० व २३ वर्षीय महिलांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Web Title: Coronavirus Sangamner Taluka 38 new corona infected