Coronavirus : संगमनेर तालुक्यात १५ नवे करोनाबाधित
Coronavirus | संगमनेर: संगमनेर तालुक्यात मंगळवारी १५ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १,२५३ इतकी झाली आहे. मंगळवारी खासगी प्रयोगशाळेतून ७ तर रॅपिड अॅटीजेन टेस्टद्वारे ८ रुग्ण आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहरात रंगारगल्ली येथे ५७ वर्षीय पुरुष, तहसील कार्यालयजवळ ५२ वर्षीय पुरुष, गणेश नगर येथे ४७ वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनीत ४२ वर्षीय महिला, तालुक्यात घारगाव येथे ४२ वर्षीय व्यक्ती, म्हस्वंडी येथे ६८ वर्षीय व्यक्ती, अकलापूर येथे ३२ वर्षीय तरुण बाधित आढळून आला आहे,
रॅपिड अॅटीजेन टेस्टद्वारे ८ रुग्ण यामध्ये शहरात मालदाड रोड येथे ४४ वर्षीय तरुण, साळीवाडा येथे ५५ वर्षीय पुरुष, व ४५ वर्षीय महिला, सुकेवाडी येथे १६ वर्षीय तरुणी, ढोलेवाडी येथे ४५ वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथे ४५ वर्षीय महिला, माळवाडी येथे २ वर्षीय बालक, ३४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Web Title: Coronavirus Sangamner taluka 15 corona infected