आज संगमनेर तालुक्यात १२ तर अकोले तालुक्यात ५ करोनाबाधित
Coronavirus/संगमनेर: संगमनेर शहरासह तालुक्यात आज बारा रुग्ण आढळून आले आहेत. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेर तालुक्यात बारा रुग्ण आढळून आले आहेत.
या अहवालानुसार घोडेकर मळा येथे २७ वर्षीय तरुण, पदामानगर येथे २४ वर्षीय महिला, माळीवाडा ५५ वर्षीय व्यक्ती, इंदिरानगर येथे २० वर्षीय युवती, देविगल्ली परिसरातील १८ वर्षीय तरुणी व ३६ वर्षीय महिला, बाजारपेठेतील १४ वर्षीय मुलाला करोनाची लागण झाली आहे.
तालुक्यातील कसारा दुमाला येथे ६५ वर्षीय, ३१ वर्षीय व २९ वर्षीय पुरुष व ४७ वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथे ३६ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ४९५ इतकी झाली आहे.
अकोले तालुक्यात तहसील कार्यालयातील ३५ वर्षीय कर्मचारी, धुमाळवाडी रोडवरील ५१ वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे १५ वर्षीय मुलगा, माणिक ओझर येथे ६५ वर्षीय वृद्ध आणि ३५ वर्षीय पुरुष अशा पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे, तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ७९ इतकी झाली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner taluka 12 and Akole taluka 5 infected