संगमनेरात कुरण ११, पेमरेवाडी १, अकोले ब्राम्हणवाडा येथील २ करोनाबाधित
Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज एकूण १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर अकोले तालुक्यात पाच रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील खासगी अहवाल दोन तर धुमाळवाडी हद्दीतील एक महिलेचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आले असून आज सायंकाळी ब्राम्हणवाडा येथील दोन जणांचा शासकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात आज पाच रुग्ण आढळून आले आहे. अकोले तालुक्यात एकूण ३४ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामधील २४ जण करोनामुक्त झाले आहेत तर ९ जण उपचार घेत आहेत.
संगमनेर तालुक्यात कुरण येथे ११ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील पंजाब कॉलनी येथील ६० वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिलेस करोनाची बाधा झाली आहे. शहरालगत ढोलेवाडी येथील ५२ वर्षीय व्यक्तीस करोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील पेमरेवाडी येथे एक रुग्ण आढळून आला आहे. असे दिवसभरात १५ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्याची करोनाबाधीतांची संख्या १६५ वर पोहोचली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner Akole corona news update today