संगमनेर करोना ब्रेकिंग: तालुक्यात आज तब्बल ३७ करोनाबाधित
Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज मंगळवारी तब्बल ३७ रुग्ण आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळेतून तीन अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३४ अहवाल रॅपिड अँटीजेन मार्फत प्राप्त झाले आहेत.
खासगी अहवालात शहरातील मालदाड रोड, अशोक चौक, देवीगल्ली येथे करोनाबाधित आढळून आले आहेत.
सायंकाळी रॅपिड अँटीजेन मार्फत अहवालात संगमनेर शहरातील मालदाड येथे पाच वर्षीय बालिका, शिवाजीनगर येथे ५ वर्षीय बालिका व १६ वर्षीय तरुणी, ३५ वर्षीय महिला आढळून आली आहे. बाजारपेठ ६९ वर्षीय पुरुष, विद्यानगर ३४ वर्षीय व्यक्ती व ११ वर्षीय बालक, गणेशनगर ४६ वर्षीय पुरुष, नगरपालिका कॉलनीजवळ २५ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.
त्याचबरोबर तालुक्यात निमोण येथे ४२,६०,३०,४३,२७,४०,६०,१७, १० वर्षीय महिला तर ३५,६०,३५,२७,६ वर्षीय पुरुष यांचा असा एकूण १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नांदुरी दुमाला येथील ४७ वर्षीय पुरुष, घुलेवाडी ३५ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, जवळे कडलग येथील ६५, २५ वर्षीय महिला, ३३, २८ वर्षीय पुरुष, सुकेवाडीतील ६० वर्षीय महिला, गुंजाळवाडी १८ वर्षीय युवक, कोल्हेवाडी येथील ४८ वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेर तालुक्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ४२६ इतकी झाली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner 37 corona infected today