Home संगमनेर धक्कादायक: संगमनेर तालुक्यात आज आणखी २० जण करोना पॉझिटिव्ह

धक्कादायक: संगमनेर तालुक्यात आज आणखी २० जण करोना पॉझिटिव्ह

Coronavirus Sangamner 20 corona positive today

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात काल बुधवारी दिवसभरात ५१ करोनाबाधित आढळून आले. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी नव्याने १२ रुग्ण आढळून आले तर सायंकाळी पुन्हा आणखी आठ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्यात ३०० चा आकडा पार झाला आहे.

आज गुरुवारी सकाळी शहरातील देवीगल्ली येथे ६० वर्षीय पुरुष, लखमीपुरा येथे ५० वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरालगत ढोलेवाडी येथे २५ व १६ वर्षीय पुरुष आणि १२,१४ २१,६५ वर्षीय महिला आढळून आले आहेत. निमोण येथे ६५ व ४५ वर्षीय पुरुष आणि २५ वर्षीय महिला आणि घुलेवाडी येथील ५७ वर्षीय पुरुष असे एकूण १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज गुरुवारी सायंकाळी प्राप्त खासगी प्रयोगशाळा अहवालात संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे ५० व ४० वर्षीय पुरुष,४६ वर्षीय महिला, रहेमतनगर येथे २४ वर्षीय तरुण, ४४ वर्षीय महिला, घोडेकर मळा येथील ४९ वर्षीय पुरुष आणि तालुक्यातील घुलेवाडी येथील १३ वर्षीय महिला व ५९ वर्षीय पुरुष असे आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner 20 corona positive today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here