संगमनेरात १३ जण तर अकोले ब्राम्हणवाडा येथील दोन करोना बाधित
Coronavirus/संगमनेर: आज संगमनेर तालुक्यात्त तब्बल १३ जण करोनाबाधित तर अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील दोन करोनाबाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०८, संगमनेर खुर्द येथे ०१, घुलेवाडी येथे ०१, संगमनेर शहरातील रहेमत नगर ०१ , विठ्ठलनगर ०१, श्रमिकनगर ०१ येथे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एकूण संख्या १२६ वर पोहोचली आहे.
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा मुंबईहून आलेल्या दोन व्यक्ती काही दिवसांपूर्वी बाधित आढळून आल्यानंतर आज त्यांच्या संपर्कातील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अजून काही व्यक्तींचे अहवाल येणे बाकी आहे. या सर्वांनी लग्नसमारंभात हजेरी लावली होती.
Website Title: Coronavirus Sangamner 13 Akole two corona infected