करोनाचे थैमान: संगमनेरात आणखी दोन एकूण ४६ तर अकोलेत दोन एकूण ११
संगमनेर: करोनाने संगमनेर तालुक्यात अक्षरशः थैमान घातले असून एकाच दिवशी सात रुग्ण आढळून आले आहेत. आज अकारा वाजता हाती आलेल्या अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात आणखी सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यात संगमनेरचे दोन तर अकोले तालुक्यातील दोन रुग्ण आढळून आले आहे. संगमनेर एकूण संख्या ४६ वर पोहोचली आहे, अकोले तालुक्याची ११ वर गेली आहे तर अहमदनगर जिल्ह्यात एकूण करोनाबाधित १४७ झाले आहे.
संगमनेर तालुक्यात निमोण येथे ४० वर्षीय व्यक्ती तर आठ वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सायंकाळी पाच रुग्ण आढळून आले आहे तर आता दोन असे दिवसभरात सात जण करोनाबाधित सापडले आहे.
मुंबईहून अकोले तालुक्यातील वाघापुर येथे आलेली ६२ वर्षे वयाची महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर घाटकोपर होऊन अकोले तालुक्यातील जांभळे येथे आलेला ५३ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे अकोले तालुक्यातील एकूण संख्या ११ वर पोहोचली आहे.
राहाता तालुक्यात भिमनगर शिर्डी येथील 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह सापडली आहे तर मुंबईहून शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथे आलेली साठ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण सोळा रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यातील ही आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात एकूण करोनाबाधित १४७ झाले आहे.
Website Title: Coronavirus news update Sangamner Akole Ahmednagar