Coronavirus: कोपरगाव तालुक्यात सात जण करोनाबाधित
Coronavirus/कोपरगाव: कोपरगाव शहरासह तालुक्यातही करोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. रविवारी कोपरगाव तालुक्यात ११ रुग्ण आढळून आले होते.
सोमवारी कोपरगाव तालुक्यात सात अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ५० व्यक्तींचे स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील ४३ निगेटिव्ह आले असून सात जण पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
या प्राप्त झालेल्या अहवालात पढेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, ३ वर्षीय मुलगा तसेच ३१ व ३३ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. सुरेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष, शहरातील गांधीनगर येथील ६७ व ७३ वर्षीय दोन महिला करोना बाधित आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.
तालुक्यात सात करोनाबाधित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाधित रुग्णांचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Kopargaon taluka seven infected