अकोले तालुक्यात वाघापूर येथे एक करोनाबाधित
Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात करोनाबाधित रुग्णांचे लोण ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. काल शहरातील तहसील कार्यालयात करोनाबाधित आढळून आला होता तर ग्रामीण भागात चार रुग्ण आढळून आले होते.
अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील वाघापूर येथे एक करोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ८० इतकी झाली आहे.
आज अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत वाघापूर येथील एका २८ वर्षीय तरुणाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज सहा जण करोनामुक्त झाले आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एक ने भर पडून एकूण ८० करोनाबाधित झाले आहे. ३ मयत तर १६ जणांवर उपचार सुरु आहेत.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Akole Waghapur corona infected