चिंताजनक: अकोले तालुक्यात एकाच दिवशी १३ करोनाबाधित
Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात एकाच दिवशी रविवारी १३ करोनाबाधित आढळून आल्याने तालुक्याची चिंता वाढलेली दिसून येत आहे. माणिक ओझर येथे तब्बल ९ जणांना करोनाची बाधा झाली आहे.
अकोले तालुक्यात सकाळी वाघापूर येथील २८ वर्षीय तरुणाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री पुन्हा १२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. या अहवालानुसार माणिक ओझर येथे ९ यात ५८ वर्षीय, ६० वर्षीय, २८ वर्षीय, २२ वर्षीय महिला तर २५ वर्षीय पुरुष, ११,८,४,२ वर्षीय मुलींना करोनाची लागण झाली आहे.
गोडेवाडी(केळी) येथील ४० वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला यांना करोनाचे संक्रमण झाले आहे. रेडे येथे २२ वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आला आहे.
तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ९२ इतकी झाली आहे. ६१ जण करोनामुक्त तर ३ मयत, सध्या २८ जणांवर उपचार सुरु आहे. करोनाचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर आल्याने तालुक्यासाठी करोना चिंताजनक ठरत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Akole taluka 13 corona infected