अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथे एक करोनाबाधित
Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात आज एक करोनाबाधीताची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५१ झाली आहे.
अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो व्यक्ती नाशिकहून जाऊन आल्याचे समजते. तो ग्रामीण रुग्णालयात येण्यापूर्वी आठ दिवस तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील तसेच त्या रुग्णालयाचे डॉक्टरचे स्त्राव घेऊन तपासणी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांना विलगीकरण करण्यात येणार आहे.
तसेच ही व्यक्ती काही नातेवाईक यांच्या संपर्कात आलेले समजते. दरम्यान अकोले तालुक्यातील एक व्यक्ती आज करोनामुक्त झालेली आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Akole Bahirvaadi corona infected