अहमदनगरमध्ये आणखी दोन जणांना करोनाची लागण, संख्या ४० वर
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील करोना रुग्णांच्या संखेत शुक्रवारी आणखी ०२ व्यक्तींची भर पडली आहे. जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा पॉझीटीव्ह आला आहे. एकट्या जामखेडमध्ये करोनाबाधितांची संख्या १४ झाली आहे.
बुधवारी करोना बाधित आढळलेल्या २ व्यक्तींचे हे दोन्ही मित्र असून त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४० वर पोहोचली आहे. त्यापैकी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये १४ रुग्ण उपचार घेत आहेत. आढळून आलेल्या व्यक्तींपैकी एक २३ वर्षाचा तर दुसरा १६ वर्षाचा आहे. अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णांची दोन्ही मुले करोनाबाधित झाले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने या दोन युवकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Website Title: Coronavirus Ahmednagar two patient found