Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आणखी १४ जण तर संगमनेरचा एकाचा समावेश

अहमदनगर जिल्ह्यात आणखी १४ जण तर संगमनेरचा एकाचा समावेश

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १९ तर सायंकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्राप्त झाले आहेत.

आज आणखी १४ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल पीएमटी लोणी व पुणे येथील खासगी रुग्णालयातून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक तब्बल ४३ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यामध्ये दाढ ता. राहता येथील सात, संगमनेर येथील एक, कोल्हार येथील तीन, मजले चिंचोली ता. नगर येथील एक, सारसनगर नगर शहर दोन अशा रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  

मजले चिंचोली ता. नगर येथील एक, सारसनगर नगर शहर येथील पुणे येथे उपचार घेत आहेत तर दाढ ता. राहता येथील सात, संगमनेर येथील एक, कोल्हार येथील लोणी येथे उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ४६५ झाली आहे. जिल्ह्यात सध्या १४४ जण उपचार घेत आहेत. बरे झालेले ३०७ तर मृत्यू झालेले १४ जण आहेत.

Web Title: Coronavirus Ahmednagar corona patient today 43 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here