अहमदनगर जिल्ह्यात आणखी ३ करोनाबाधित, एकूण संख्या ४३ वर
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात बरयाच ठिकाणी ब्रेक बसला असला तरी जामखेड तालुक्यात करोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी आलेल्या ९ व्यक्तींच्या अहवालात जामखेडचे ३ व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे येथील लष्करी महाविद्यालयाकडे जिल्हा रुग्णालयाने शनिवारी पाठविलेल्या अहवालापैकी जामखेडच्या तीन व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यात दोन पुरुष तर एक महिलेचा समावेश आहे. एकट्या जामखेड तालुक्यात १७ करोनाबाधित आढळून आले आहे. तर जिल्ह्यातील करोना बाधितांची एकूण संख्या ४३ वर पोहोचली आहे.
शनिवारी ४१ व्यक्तींचे घशातील स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यातील ३८ अहवाल शनिवारी प्राप्त झाले होते त्यातील सर्वजणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते मात्र उर्बारीत ३ अहवालांची प्रतीक्षा होती. ते अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले आहेत. त्या तिघांचे अहवाल करोना पॉझीटीव्ह असे आल्याने जामखेडमधील ३ व्यक्तींना करोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४५ आणि ५० वयोगटातील पुरुष तर ३५ वयाची महिला आहे. काही दिवसांपूर्वी एकाचा वडिलांना यानंतर या युवकांच्या मित्रांना लागण झाली होती. रविवारी पुन्हा त्यांच्याच संपर्कातील तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यामुळे नगर जिल्ह्याची एकूण आकडेवारी ४३ वर पोहोचली आहे.
Website Title: Coronavirus Ahmednagar Another three patient