Coronavirus: अहमदनगरमध्ये आणखी एक करोना बाधित
Coronavirus/अहमदनगर: जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविण्यात आलेल्या अहवालापैकी २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली आहे.
करोनाबाधित रुग्णांपैकी एक व्यक्ती जामखेडची आहे तर दुसरी व्यक्ती नेवासे येथील आहे. जामखेड येथील व्यक्तीचा दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र त्याचा अहवाल न आल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. आज तो अहवाल आला आणि तो करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान नेवासे येथील एका व्यक्तीचा दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
Website Title: Coronavirus Ahmednagar another one patient