अहमदनगर जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा ३८ वर
अहमदनगर: नेपाळ येथून संगमनेरला परतलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले तर रात्री उशिरा जामखेड येथील स्थानिक नागरिकालाही करोनाची लागणझाली असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
जामखेड येथील दोन जणांना बुधवारी दिनांक २२ करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील एकाच्या वडिलांचा अहवाल गुरुवारी दिनांक २३ एप्रिल रात्री उशिरा पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण संख्या ३८ वर पोहोचली आहे.
संगम्नेत येथील १४ जणांना ४ एप्रिलला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला होता मात्र १४ दिवसानंतर या १४ व्यक्तींमधून ४ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. या सर्वाना संगमनेर येथील संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे. नगरमध्ये आत्तापर्यंत २० रुग्ण बरे झाले आहेत.
Website Title: Coronavirus Ahmednagar 38 patient