अहमदनगर जिल्ह्यात ३४० रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज
Coronavirus/अहमदनगर: जिल्ह्यातील डिस्चार्ज संदर्भातील नवीन नियमानुसार ताप नसेल, करोनाची लक्षणे नसतील तर त्यांना सात दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे. आज ३४० जण करोना मुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात २ हजार २८५ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. आज बरे झालेल्या ३४० रुग्णांत संगमनेर ३१, राहता १८, पाथर्डी २,नगर ग्रामीण १८, श्रीरामपूर ११, कॅन्टोनमेंट ७, नेवासा २, श्रीगोंदा ५, पारनेर ९, अकोले १,राहुरी ९, शेवगाव ४, कोपरगाव १ नगर शहर सर्वाधिक २२२ अशा रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांना डिस्चार्ज मिळत असल्याने एक मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला टेलिग्राम चॅनेल वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(@SangamnerAkoleNews) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Ahmednagar 340 patient discharge