Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात २६ करोनामुक्त तर संगमनेरात एकाचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात २६ करोनामुक्त तर संगमनेरात एकाचा मृत्यू

संगमनेर: संगमनेर शहरातील आणखी एक बळी करोनाने घेतला आहे. संगमनेर शहरातील श्रमिकनगर येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

संगमनेर शहरातील श्रमिकनगर येथे चार जुलै रोजी ६५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तो व्यक्ती संगमनेर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधित मृत्यूची संख्या १३ झाली आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात २६ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील २६ रुग्णांनी आज करोनामुक्त झाले आहेत. आज २६  कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये  नगर मनपा १४, कोपरगाव ०३, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०४, श्रीरामपूर ०१. येथील रुग्णांचा समावेश आहे.   

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar 26 corona free and sangamner one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here