Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरवात
अहमदनगर: अखेर लसीची प्रतीक्षा संपली. अहमदनगरच्या आरोग्य कर्मचार्यांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या आठ केंद्रावर लसीकरणास सुरुवात करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजून स्वागत व आनंद व्यक्त केला.
महापालिकेच्या तोफखाना येथील केंद्रावर करोना योद्धा असलेल्या आरोग्य कर्मचारी याला पहिली लस देण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालय येथेही प्रारंभ करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्यात एकूण १२ केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालय, आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उप जिल्हा रुग्णालय पाथर्डी, उप जिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात ३१ हजार १९६ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद पोर्टलवर झालेली आहे. त्यातील १२ केंद्र अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सुरुवातीला लसीकरण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात ३९ हजार लशींचे डोस प्राप्त झाले असून दररोज १०० जणांना पप्रत्येक केंद्रावर लस दिली जाणार आहे.
Web Title: Corona vaccination begins in Ahmednagar