Home महाराष्ट्र Corona Update: राज्यात कोरोनाचे विस्फोटक रूप सुरूच

Corona Update: राज्यात कोरोनाचे विस्फोटक रूप सुरूच

Corona update of Maharashtra Mumbai Pune 

मुंबई | Corona update : महाराष्ट्रात कोरोनाने विस्फोटक रुप घेतले आहे. रुग्णसंख्या चांगलीच वाढीस लागली आहे.  राज्यात काल एकाच दिवसात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात कोरोनाने ७ रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्याची कोरोना स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३५ टक्के एवढे झाले आहे. मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे.

मुंबईत कोरोनाचे (Mumbai) ६,३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. पुणे (Pune Corona Update) जिल्ह्यात तब्बल ६३१ नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. पुणे जिल्ह्यातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार २७४ वर पोहोचली आहे.

Web Title: Corona update of Maharashtra Mumbai Pune 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here