पर्यटन भोवले: जुन्नर तालुक्यात ७ जणांना ओमायक्रॉनची लागण
जुन्नर | Corona news Update Omicron in Junnar : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव वारुळवाडी येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी व नारायणगाव येथील एकूण ७ जणांना ओमायक्रॉनची) लागण झाल्याचे समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पर्यटन वरून ते परत आल्यानंतर १२ डिसेंबरला १६ जणांचे RTPCR नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनने दहशत निर्माण केली आहे.
१७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेच्या (NIV) अहवालानुसार हे सर्व जण ओमायक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे या सर्व रुग्णांचे लसीकरण झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील 5 जणांचे कोविशील्ड चे दोन्ही डोस पूर्ण असून उर्वरित दोघांनी एक डोस घेतला आहे. सर्व रुग्णांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात विलगीकरणात ठेण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील नातेवाईक व इतर नागरिकांची RTPCR तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान रायगड जिल्ह्यात ओमन येथून दोन दिवसांपूर्वी एक महिला माणगाव गोरेगाव येथे आपल्या गावी आली होती. तर साऊथ आफ्रिका येथून पुरुष हा खारघर येथे आला आहे. या दोघांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने घरीच विलगीकरण करण्यात आले आहेत. माणगाव येथून महिलेच्या संपर्कात आलेल्या पाच ते सहा जणांचे नमुने आरोग्य विभागाने घेतले असून महिलेसह त्याचेही नमुने ओमोक्रोन तपासणी साठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
Web Title: Corona news Update Omicron in Junnar