चिंता वाढली: ओमिक्रॉनची रुग्णसंख्या १०१ वर, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
नवी दिल्ली | Corona News Update Omicron 101: सध्या प्रत्येक देशात ओमिक्रॉनचं संकट आहे. भारतात देखील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत आहे. आज ओमिक्रॉनची संख्या १०१ झाली असून ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
देशभरात 101 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, चंदीगढ या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक ३२ रुग्ण महाराष्ट्रात असून २२ रुग्ण दिल्लीत आहेत. राजस्थानमध्ये १७ रुग्ण आढळून आले असून कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी ८ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गुजरात आणि केरळमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण आढळून आले आहेत. आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ओमिक्रॉनचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण:
राज्यात ओमिक्रॉनचे एकूण ३२ रुग्ण आहेत. यामध्ये १३ मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे महापालिका क्षेत्रात २, उस्मानाबादमध्ये २, कल्याण-डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई-विरार आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. एकूण ३२ रुग्णांपैकी २५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत ओमिक्रॉनबाधितांचा आकडा आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे
Web Title: Corona News Update Omicron 101