Corona News: अकोले तालुक्यात एकाच दिवसात २० व्यक्ती कोरोना बाधित
अकोले | Corona News: अकोले तालुक्यात रविवारी एकाच दिवसांत २० करोनाबाधित आढळुन आले आहेत राञी उशिराने अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील सावरकर मार्गावरील ५५ वर्षीय महीला, कोतुळ येथील ४० वर्षीय पुरूष, ३९ वर्षीय पुरूष, ५२ वर्षीय महीला, ब्राम्हणवाडा येथील २१ वर्षीय तरुण,५१ वर्षीय महीला, चास येथील ३० वर्षीय पुरूष, चास येथील ४५ वर्षीय पुरुष, वाघापुर ( कोतुळ) येथील ४५ वर्षीय पुरूष अशा व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
रविवारी सकाळी तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये तालुक्यातील नवलेवाडी येथील ६० वर्षीय पुरूष, विठा येथील ४५ वर्षीय महीला,निब्रळ येथील ४० वर्षीय पुरूष, चास पिंपळदरी येथील ४५ वर्षीय महीला, २४ वर्षीय तरुण, अशा ०५ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात चितळवेढे येथील ४८ वर्षीय पुरूष अश्या ०६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला तर सायंकाळी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात बेलापुर येथील ५४ वर्षीय महीला, ब्राम्हणवाडा येथील २८ वर्षीय तरुण, चैतन्यपुर ( ब्राम्हणवाडा) येथील ४० वर्षीय पुरूष, लिंगदेव येथील ५८ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महीला अशा ०५ व्यक्ती सह दिवसभरात तालुक्यात एकुण २० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ६७५ झाली आहे.
त्यापैकी ५३० व्यक्ती उपचार करुन बरे होऊन घरी गेले व ११ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर १३४ व्यक्तीवर उपचार सुरु आहे.
पत्रकार: अल्ताप शेख अकोले
Web Title: Corona News Akole Taluka 20 Corona infected