संगमनेर तालुक्यात मंगळवारी याठिकाणी आढळले करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शहरात ११ तर ग्रामीण भागातून २४ जण असे ३५ जण मंगळवारी बाधित आढळून आले आहे.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात इंदिरानगर येथे ४६ वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथे ४७ वर्षीय पुरुष, वकील कॉलनी येथे ८७ वर्षीय पुरुष, साईनगर येथे १८ वर्षीय तरुण, मोरया ट्रेडर्स अकोले बायपास संगमनेर १७ वर्षीय पुरुष, संचयन भवन गणेशनगर येथे ६५ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली स्वातंत्र्य चौक येथे ४८ वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे ७१ वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथे ६५ वर्षीय महिला, भारतनगर मालदाड रोड येथे ६५ वर्षीय पुरुष असे ११ बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून अकलापूर येथे ७० वर्षीय महिला, घुलेवाडी येथे ३१,४१,३२ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, वेल्हाळे मळा येथे ३४ वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे ८१ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ५७ वर्षीय पुरुष, चिखली येथे ६७ वर्षीय पुरुष, डोळासणे येथे ९ वर्षीय मुलगी, ६४ वर्षीय पुरुष, ८ वर्षीय मुलगा, २६ वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथे १७ वर्षीय महिला, ७४ व १६ वर्षीय पुरुष, वरुडी पठार येथे ५८ वर्षीय महिला, निमोण येथे ७१ वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे ६२ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे ५९ वर्षीय पुरुष असे २४ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Corona infected found here in Sangamner taluka News
अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमचा 9022786511 नंबर सेव करून तुमच्या गृपमध्ये समावेश करा.