Home महाराष्ट्र लसीबाबत इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य, याबाबत राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

लसीबाबत इंदोरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य, याबाबत राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

Controversial statement of Indorikar Maharaj regarding vaccine

बारामती: मी लस (Vaccination) घेतलेली नाही आणि घेणार नाही. तुमचं मन खंबीर असेल तर तुम्हाला कोरोना होणार नाही असे विधान इंदुरीकर महाराजांनी (Indorikar maharaj) केल्याने खळबळ उडवून दिली आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की आपण इंदुरीकर महाराजांना लसीचे महत्व पटवून देणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

‘मी स्वतः इंदुरीकर महाराजांना भेटून वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन आणि ते त्यांच्या किर्तनातून करोना प्रतिबंधक लशीबाबत प्रबोधन करतील,  असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. मात्र या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज्य सरकार इंदुरीकर यांच्यावर कारवाई करणार का, या प्रश्नाला मंत्री टोपे यांनी बगल दिली आहे.

बारामतीत बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद केला. इंदुरीकर महाराज यांनी लसीकरणा विरोधात नुकतंच विधान केलं आहे. मी स्वतः लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही, असं ते नाशिकमध्ये एका किर्तनात म्हणाले होते.

Web Title: Controversial statement of Indorikar Maharaj regarding vaccination

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here