अहमदनगर: पोकलेनची पिन उडून लागल्याने ठेकेदाराचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: वन्य प्राणी उपचार केंद्र उभारणीचे काम सुरू असताना पोकलॅनच्या बकेटची उडालेली पिन थेट चेहऱ्यावर आदळून ठेकेदाराचा मृत्यू.
राहुरी : डिग्रस येथील वन विभागाच्या नर्सरीत वन्य प्राणी उपचार केंद्र उभारणीचे काम सुरू असताना पोकलॅनच्या बकेटची उडालेली पिन थेट चेहऱ्यावर आदळून ठेकेदार संदीप संभाजी पानसंबळ (वय ४५) यांचा मृत्यू झाला.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या उपचार केंद्र निर्मितीचा ऑनलाईन ठेका घेतलेले संदीप पानसंबळ (रा. सडे) यांच्यामार्फत सुरू होते. या केंद्राची पायाभरणी करण्यासाठी पोकलॅनचा वापर केला जात होता. पायाभरणी पूर्ण झाल्यानंतर पोकलॅन मशिनची चेन असल्याचे लक्षात आले. त्या वेळी पोकलॅन ऑपरेटर व मजुरांकडून चेनची जोडणी करण्यात येत होती. सोमवारी (१७ जून) दुपारी एकच्या सुमारास पोकलॅनच्या बकेटद्वारे चेनमध्ये २५ ते ३० किलो वजनाची पिन वसविली जात होती. चेनमध्ये असलेल्या स्प्रिंगला अधिक ताण बसत गेल्याने बकेटद्वारे पिन ठोकली जात असतानाच ती वेगाने उडाली. उडालेली पीन अडखळत पोकलॅनपासून १० ते १५ फूट अंतरावर फोनवर बोलत असलेले पानसंबळ यांच्या चेहऱ्याला लागली. त्यात ते रक्तबंबाळ झाले, मजूर व ऑपरेटर यांनी तत्काळ त्यांना रुणालयात हलविले. परंतु अधिक रक्तस्राव व पिनच्या जोरदार फटक्याने पानसंबळ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनानंतर सडे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप पानसंबळ यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
Web Title: Contractor dies after Poklen’s pin flies off
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study