अकोलेच्या नगराध्यक्षपदी वडजे यांची निश्चिती मात्र याबाबत ….
Akole News: नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांची निवड निश्चित आहे मात्र याबाबतची अधिकृत घोषणा दि. 27 सप्टेंबर रोजी होणार.
अकोले: अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांची निवड निश्चित आहे मात्र याबाबतची अधिकृत घोषणा दि. 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. बुधवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी निवड प्रक्रिया पूर्ण होऊन पीठासीन अधिकारी प्रांत शैलेश हिंगे हे अधिकृत निवड जाहीर करणार आहेत.
गत वर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 17 पैकी 12 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले होते. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले आहे. त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे या पदाचे प्रबळ दावेदार समजले जात होते मात्र ऐनवेळी नगराध्यक्षपदाची माळ भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी यांच्या गळ्यात पडली होती.
नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी यांनी 4 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी जाहीर केला होता. त्यानुसार प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या उपस्थितीत सत्तारूढ भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाळासाहेब वडजे, नगरसेवक शरद नवले, हितेश कुंभार, विजय पवार, सागर चौधरी, सौ. शितल वैद्य, सौ. प्रतिभाताई मनकर, सौ. वैष्णवी धुमाळ, सौ. कविता शेळके, सौ. तमन्ना शेख, सौ. माधुरी शेणकर, सौ. जनाबाई मोहिते, विरोधी गटाचे नगरसेवक नवनाथ शेटे, आरिफ शेख, श्वेताली रुपवते, प्रदिप नाईकवाडी यांची बैठक नगरपंचायत सभागृहात दुपारी पार पडली.
तत्पूर्वी माजी आमदार वैभव पिचड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, माजी सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका शितल अमोल वैद्य यांची तर अनुमोदक म्हणून नगरसेवक शरद नवले यांची स्वाक्षरी आहे.
शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी अर्ज माघारीचा दिवस आहे. दिनांक २७ सप्टेंबरला पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची विशेष सभा होऊन निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
Web Title: Confirmation of Vadje as Mayor of Akole but
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App