अकोलेत लम्पी रोगाचा शिरकाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता, ही आहेत लक्षणे आणि उपाय
Concern among farmers due to outbreak of lumpy disease in Akole.
अकोले: अकोले तालुक्यात शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. लम्पी रोगाने (lumpy disease) राज्यात थैमान घातले असून अकोले तालुक्यात 18 जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. लम्पीचा अकोल्यात शिरकाव झाल्याने शेतकर्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे अकोले तालुका पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.
तालुक्यातील गर्दणी, धामणगाव आवारी , ब्राम्हणवाडा याठिकाणी ही लम्पीची लागण झालेली जनावरे सापडली आहेत. दरम्यान कळस, विरगाव, देवगाव, सातेवाडी येथील लम्पी संशयित जनावरांचे रक्ताचे व गाठींचे नमुने पुणे येथील अन्वेषण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे यांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने श्री. ससे यांची तालुका पालक म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी पंचायत समितीमध्ये तातडीने एक बैठक बोलावली होती.
या बैठकीस अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल शेळके, तालुका पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदळे, अमृतसागर दूध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत, लम्पी एक्सपर्ट डॉ. राजेंद्र भांगरे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सरकारी व खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर, पशुधन पर्यवेक्षक हेही उपस्थित होते.
पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहमदनगर
लम्पी स्किन डिसीज
* रोगाची कारणे
* रोग प्रसार
* हा आजार विषाणूजन्य आहे
* चावणा-या माश्या
* अत्यंत संसर्गजन्य आजार
* डास
* देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स प्रवर्ग
* गोचिड / चिलटे
* बाधीत जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने
* दुषित चारा व पाणी
* लक्षणे
* अंगावर १० ते ५० मि.मी. व्यासाच्या गाठी
* सुरूवातीस भरपूर ताप
* डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव * चारा पाणी खाणे बंद / कमी
* दुग्ध उत्पादन कमी
* काही जनावरात पायावर सुज येवून लंगडणे
* रोग नियंत्रण
* गोठ्यामध्ये डास, माश्या, गोचिड होणार नाही याची दक्षता घ्यावी.
* जनावरांवर उपचार करतांना नविन सिरिंज निडल चा वापर करावा.
* गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती / डॉक्टर येणार असतील तर सर्व प्रथम त्यांचे निर्जतुकिकरण करावे. * साथिचा आजार सुरू असे पर्यंत बाजारातुन जनावरांची खरेदी विक्री थांबवावी.
* पशु पालकांनी घ्यावयाची काळजी
* बाधित जनावरे तात्काळ वेगळे करावे
* गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड फिनेल यांची फवारणी करावी * जनावरांना आयव्हरमेक्टींग इंजेक्शन दिल्यास किटक गोचिड यांचे नियंत्रण होते
* गावामध्ये किटकनाशक औषधाची फवारणी करावी.
* जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष संपर्क:
१) डॉ. आर. एस. जाधव (सहा. आयुक्त पशुसंवर्धन) मो: ९८२२९५०५४२
२)डॉ. व्हि.व्हि. सावळे (पशुधन विकास अधिकारी) मो: ९४२३४३०१३६
३) डॉ. व्हि. पी. भिसे (पशुधन विकास अधिकारी ) मो. ९५२७५६४०१०
* पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती तालुका स्तर
Web Title: Concern among farmers due to outbreak of lumpy disease in Akole