Home पुणे संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून

संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून

Breaking News | Pune Crime: संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून, आईचा मृतदेह बाथरूममध्ये टाकून पळ काढला.

Computer engineer son stabs teacher's mother to death

पुणे : संगणक अभियंता मुलाने शिक्षिका असलेल्या आईचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याने आईचामृतदेह बाथरूममध्ये टाकून पळ काढला.

ही घटना एनआयबीएम रोड कोंढवा येथील कुबेरा गार्डन सोसायटीत 24 ते 28 में या कालावधीत घडली आहे. मृतदेह कुजल्यामुळे फ्लॅटमध्ये दुर्गंधी सुटली होती. लता आल्फ्रेड बेंझामिन (वय 73) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मिलिंद आल्फ्रेड बेंझामिन (वय 43) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉर्थी मोजेस पनमोजेस (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी मिलिंद याला दारूचे व्यसन आहे. कोविडमध्ये नोकरी गेल्यापासून तो बेरोजगार आहे. मिलिंद हा फिर्यादींचा लहान भाऊ आहे. मिलिंद आणि त्याची आई लता आल्फ्रेड बेंझामिन हे दोघे कुबेरा गार्डन सोसायटीत एकत्र राहत होते. मिलिंद हा आईसोबत दारूच्या पैशासाठी सतत वाद करत असे. त्यातूनच त्याने चाकूने भोसकून लता आल्फ्रेड बेंझामिन यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये टाकून पळ काढला.

मिलिंद याने आईचा खून केल्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये टाकून पळ काढला. त्याने दरवाजावर ‘मॉम इन इनसाइड डोन्ट गो इन… कॉल द पोलिस’ असे लिहिले होते. तसेच, पळून जाताना त्याने आईचा मोबाईल लंपास केल्याचे दिसून आले आहे.पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. 

Web Title: Computer engineer son stabs teacher’s mother to death

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here