Home उस्मानाबाद ‘सॉरी भावांनो…..’ वर्गमित्रांना मेसेज पाठवून केली आत्महत्या

‘सॉरी भावांनो…..’ वर्गमित्रांना मेसेज पाठवून केली आत्महत्या

Osmanabad: ‘सॉरी भावांनो…..’ असा मेसेज टाकून व तोच वर्गमित्रांनाही पाठवून या २० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Suicide).

Committed suicide by sending messages to classmates

उस्मानाबाद: जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर ‘सॉरी भावांनो…..’ असा मेसेज टाकून व तोच वर्गमित्रांनाही पाठवून या २० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. तर याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आविष्कार मोहन भोजने (वय 20 वर्षे) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

उस्मानाबादच्या तुळजापूर खुर्द येथील आविष्कार भोजने याने रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सोमवारी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

वडिलांवर असलेल्या कर्जामुळे आविष्कार सतत तणावाखाली वावरत होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याच्या दुर्वास भोजने यांच्या खबरीवरून पोलिसांनी नोंद घेतली आहे. तर तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आविष्कार हा तुळजापूर शहरातील तुळजाभवानी महाविद्यालयात कला शाखेच्या पदवी तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. घरीची आर्थिक परिस्थिती बिघडली, त्यात वडिलांवर असलेल्या कर्जामुळे आविष्कार तणावाखाली होता. रविवारी रात्री आपल्या मोबाइलवरून आविष्कार याने वर्गातील जवळच्या मित्रांना सॉरी भावांनो असा मेसेज पाठविला. तसेच, सोशल मीडियातही हा मेसेज पोस्ट करून त्याने तुळजापूर खुर्द येथील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्या काही मित्रांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आविष्कारच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

Web Title: Committed suicide by sending messages to classmates

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here