Home संगमनेर आ. थोरातांना महसुलमंत्री विखे पाटलांचा टोला, म्हणाले…

आ. थोरातांना महसुलमंत्री विखे पाटलांचा टोला, म्हणाले…

Breaking News | Sangamner: मतदारसंघ ही कोणाची मक्तेदारी नाही, तो जनतेचा आहे. ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. कोणाच्या नावाने ताम्रपट लिहिलेला नाही.

come Tola of Revenue Minister Vikhe Patil

संगमनेर: मतदारसंघ ही कोणाची मक्तेदारी नाही, तो जनतेचा आहे. ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. कोणाच्या नावाने ताम्रपट लिहिलेला नाही, आम्ही संगमनेरमध्ये उभे राहावे ही जनतेची इच्छा आहे. येथे तुमच्या इच्छेला महत्व नाही असा जोरदार टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरातांना लगावला. संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये कार्यकर्त्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील बोलत होते. या बैठकीत प्रामुख्याने तुकडा बंदीच्या प्रश्नासंदर्भात मार्ग कसा काढता येईल याचा विचारविनिमय प्राधान्याने करण्यात आला. बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी आमदार थोरातांनी केलेल्या वक्तव्यावर सडकून टीका केली.

जिल्ह्यात किती जागा निवडून येतील यावर दावा करण्यापेक्षा आधी स्वत: निवडून यायचे पहा. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांची एवढी काळजी करणार्‍या आमदार थोरातांना भाजपमध्ये यायचे आहे का? असा सवाल उपस्थित करुन संगमनेर विधानसभा मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवावी ही येथील जनतेची इच्छा आहे, येथे तुमच्या इच्छेला महत्व नाही. जनता ठरवेल ते महत्वाचे आहे. हा मतदारसंघ ही कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही किंवा त्यावर कोणाची मक्तेदारी असण्याचे कारण नाही. जनतेची इच्छा आहे, जनता याबाबत निर्णय करेल असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

संगमनेर तालुक्यातील अनेक दलालांनी सामान्य माणसाची फसवणूक अशा व्यवहारांमधून केली आहे. मात्र महसूल विभाग आता धोरणात्मक निर्णय करुन सामान्य माणसाला दिलासा कसा मिळेल याबाबत निर्णय करणार आहे. अगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचे धोरण निश्चित स्पष्ट होईल अशी ग्वाही देवून 2017 पर्यंतच्या कालावधीमध्ये तुकडा बंदी कायद्याच्या विरोधात जावून केलेले कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण किंवा विभाजन करण्यासाठी 25 टक्के अधिमूल्य प्रदान करण्याची तरतुद होती. यामध्ये थोडासा बदल करुन ही रक्कम कमी करण्याचा शासन सकारात्मक विचार करीत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. या बैठकीला नोंदणी उपमहानिरिक्षक श्री. दवंगे, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, मुंद्राक अधिकारी श्री. महाबरे यांच्यासह महसूल, इतर विभागांचे अधिकारी आणि महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: come Tola of Revenue Minister Vikhe Patil

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here