Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कॉलेज तरुणीचा विनयभंग, तरुणीचा हात धरून….

अहिल्यानगर: कॉलेज तरुणीचा विनयभंग, तरुणीचा हात धरून….

Breaking News | Ahilyanagar: तरुणीचा हात धरून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे सांगत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन.

College Tarunicha Molested, Tarunicha Haath Dharon

राहुरी : इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीच्या आधारे एक अल्पवयीन कॉलेज तरुणी आरोपीच्या संपर्कात आली. मैत्रिणीने आग्रह केल्यानंतर जबरदस्तीने त्या तरुणीला मोटारसायकलवर घेऊन जाऊन तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे ३ एप्रिल २०२५ रोजी घडली. या प्रकरणी अनिकेत भाऊसाहेब जाधव (रा. वावरथ, ता. राहुरी) याच्या विरोधात विनयभंग व ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की आरोपी अनिकेत भाऊसाहेब जाधव याला पत्न ी व दोन मुले असून तो राहुरी तालुक्यातील वावरथ येथे वास्तव्यास आहे. तर राहुरी तालुक्यातील दोन अल्पवयीन तरुणी एका महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकत आहेत.

इन्स्टाग्रामवरून ओळख; आरोपी अटकेत

त्यातील एका तरुणीची आरोपी अनिकेत जाधवशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर संवाद सुरू होता. पुढे या तरुणीने तिच्या वर्गमैत्रिणीची देखील आरोपी अनिकेत जाधवशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या मैत्रिणीचाही आरोपीशी मोबाईलवर संवाद सुरू झाला. ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, पीडीत अल्पवयीन तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत पिंपळगाव फुणगी परिसरातील घरात होती. त्यावेळी आरोपी अनिकेत जाधव तेथे आला. यावेळी त्या तरुणीच्या मैत्रिणीने जबरदस्तीने तिला अनिकेत जाधवसोबत मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने तिला म्हैसगाव येथील त्याच्या मामाच्या घरी दुपारी १ वाजेच्या सुमारास नेले. तेथे त्याने तरुणीचा हात धरून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे सांगत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर आरोपीने तिला पुन्हा मैत्रिणीच्या घरी आणून सोडले.

घटनेनंतर पीडित तरुणीने तिच्या नातेवाईकांसह राहुरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अनिकेत भाऊसाहेब जाधव, तसेच तिच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा गु. र. नं. ५४७/२०२५ खाली भारतीय दंड संहिता कलम ७४, तसेच वालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमाचे कलम ८, १२, १७ नुसार दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर राहुरी पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी अनिकेत जाधव याला ताब्यात घेऊन अटक केली.

Breaking News: College Tarunicha Molested, Tarunicha Haath Dharon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here